banner

Bridging Borders – Japan Tour At A Glance

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौर्‍यावर गेले होते, पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वपूर्ण होता आणि अपेक्षेप्रमाणे विविधांगाने यशस्वीही झाला.

मुंबईत परतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दौरा अतिशय सकारात्मक झाल्याचे सांगत पुढे म्हणाले की, “2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी जे उत्कृष्ट संबंध जपानसोबत निर्माण केले, त्यामुळे जपान मोठ्या प्रमाणात भारताला सहकार्य करत आहे. ‘स्टेट गेस्ट’ म्हणून मला जपानने निमंत्रित केले होते. या दौर्‍यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या. राज्यात आपण वर्सोवा-विरार सी लिंक तयार करतो आहे, त्यासाठी मदत करण्यास जपान सरकारने सकारात्मकता दाखविली आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळताच त्यादृष्टीने पुढची पाऊले टाकली जातील. मेट्रो 11, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला सुद्धा मदत करण्याची तयारी जपानने दर्शविली आहे. विविध प्रांतांच्या गव्हर्नर सोबत भेटी केल्या, ते गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्रात येणार आहेत. एनटीटीने गुंतवणूक दुप्पट करण्याची तयारी दर्शविली आहे. सोनी कंपनी सुद्धा गुंतवणूक करणार आहे. जायका, जेट्रो यासारख्या कंपन्यांशी सुद्धा चर्चा केली.”

जपान दौर्‍यातुन काय मिळालं हे संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर:

अशा अनेक सकारात्मक बाबी देवेंद्र फडणवीस यांनी दौर्‍यादरम्यान घडवून आणल्या आहेत, त्यामुळेच राज्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्प आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने हा दौरा यशस्वी ठरला.

Activity Roundup

Japan Diaries 2023 | YouTube Playlist