जपान दौरा पहिला दिवस
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या अभिमान गीताने मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, मग ‘टोक्यो ते क्योटो’ असा शिकान्सेन बुलेट ट्रेनने प्रवास. क्योटो, ओसाका आणि कांसाई क्षेत्रातील अनेक आघाडीच्या उद्योजकांच्या भेटी घेतल्या व महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली.
‘द लॅंड ऑफ राइजिंग सन’ जपान येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन!
21 August 2023 View Tweet 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानला पोहोचताच त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मराठी बंधु – भगिनींनी ‘लाभले आम्हास भाग्य’ हे अभिमान गीत देखील गायले.
21 August 2023View Tweet 
जपानमधील भारताचे राजदूत श्री. सिबी जॉर्ज जी व श्रीमती. जॉईस सिबी जी यांनी टोकियो येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
21 August 2023View Tweet 
सुसज्ज आणि वेगवान अशा शिंकान्सेन बुलेट ट्रेनने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोक्यो ते क्योटो पर्यंतचा प्रवास केला.
21 August 2023View Tweet 
जपानचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या क्योटो येथील किंकाकू-जी या बौद्ध मंदिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
21 August 2023View Tweet 
भारताचे कॉन्सुल जनरल श्री. निखिलेश गिरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘स्टेट गेस्ट ऑफ जपान’ हा विशेष बहुमान मिळाल्याबद्दल क्योटो येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.
21 August 2023View Tweet 