सशस्त्र माओवादापेक्षा हा दीमागी माओवाद आहे हा अधिक खतरनाक आहे, कारण त्यांना देशाचं संविधान नाकारणारी पिढीही तयार करायची आहे, असं त्यांचं उद्दिष्ट आहे, देशाच्या व्यवस्थांना उध्वस्त करणारी पिढी तयार करायची आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढताना आमच्या संविधानाच्या अंतर्गत आम्हाला लढावं लागले, आमचं संविधानचं देशाच्या प्रत्येक नागरिकाला कसं न्याय देऊ शकतं हे प्रतिपादित करावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात माओवाद विरोधात लढाई सुरु केली होती, त्यात सर्वप्रथम गडचिरोली आणि महाराष्ट्राने सफलता मिळवली, संपूर्ण देशाला आम्ही सशस्त्र माओवादापासून मुक्त केलंय, पोलिसांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे, आता जे दीमागी नक्षल आहे जे देशाच्या संविधानाला नाकारत आहेत, देशाच्या संविधानाच्या विरोधात युवकांना भडकवत आहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
