मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रख्यात सद्गुरु आमच्या माता अमृतानंद बाई यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव होतोय याचा मला अतिशय आनंद आहे, खरं तर या कार्यक्रमाचे निमंत्रण मलाही प्राप्त झाले होते, पण नेमकं आज गडचिरोलीमध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांचा भगवान बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी असल्यामुळे मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेलो नाही, पण या कार्यक्रमाला माझ्या निश्चित शुभेच्छा आहेतच, मराठी पत्रकार संघाने सुद्धा समाजातील सकारात्मक व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्याची परंपरा जपली याचा मला आनंद आहे, गेल्यावेळी श्री श्री रविशंकर जी यांना हा पुरस्कार दिला, तेव्हा मी स्वतः उपस्थित होतो, पत्रकार सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम आयोजित करतात त्यांनाही माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
