Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या आणि इतरही चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले संयुक्त उत्तर पुढीलप्रमाणे:

By Devendra Fadnavis on March 25th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 25 मार्च

ही संपूर्ण चर्चा ऐकली की मला एक शेर आठवतो…. याददाश्त का कमजोर होना, कोई बुरी बात नही जनाब बहुत बेचैन रहते है वो लोग जिन्हे हर बात याँद रहती है…

कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करताना आपण एक भान नेहमी ठेवले पाहिजे, सत्ता तुमची आमची बदलते. पण, पोलिस दल तेच असते. ज्या घटना गेल्या काळात घडल्या, त्या दुर्दैवी होत्या. पोलिस दलात गुन्हेगारांचा शिरकाव झाला, राज्यातील उद्योजकांच्याच घरासमोर स्फोटके ठेवणे, पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, गृहमंत्रीच जेलमध्ये जाणे, खुद्द पोलिस आयुक्तांना जेलमध्ये जाण्याची वेळ येणे, नेत्यांविरुद्ध कट रचणे अशा अनेक घटना घडल्या.

महिलांविरुद्धचे गुन्हे: 2022 मध्ये 44,221 गुन्हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण हे 2022 मध्ये 93.04 टक्के आहे. 2021 मध्ये ते 87 टक्के होते.

बलात्काराचे गुन्हे निर्गती करण्याचे प्रमाण : 2020 : 44 टक्के 2021 : 56 टक्के 2022 : 69 टक्के हे प्रमाण 80 टक्क्यांच्या जवळ नेणे हे आपले लक्ष्य आहे.

ऑपरेशन मुस्कान: 2015 ते 2022 : एकूण 11 ऑपरेशन बालकांचा शोध : 37,511 (यात 14,239मुली) या मोहिमेचे केंद्र सरकारने कौतुक केले.

डायल 112 : महाराष्ट्र आपातकालिन प्रतिसाद प्रणाली 2022 पूर्वी प्रतिसाद दर : 17.05 मिनिट डिसेंबर 2022 पासून प्रतिसाद दर : 9.49 मिनिट हा दर 7 मिनिटे आणण्याचा प्रयत्न.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती: अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई – 2022 मध्ये 13,647 गुन्हे – अंमली पदार्थ जप्त : 5329 कोटी रुपये – कारवाई : 13,125 आरोपींवर – अवैध वाळू उपसा : 3354 जणांवर कारवाई/93 कोटींचा मुद्देमाल जप्त – अवैध डान्सबार 2021 : 138 डान्सबारवर कारवाई 2022 : 281 डान्सबारवर कारवाई – दारुबंदी : 94,288 केसेस/78 कोटींचा माल जप्त – जुगार : 30,085 केसेस/46 कोटींचा माल जप्त – हुक्कापार्लर : 268 हुक्कापार्लर/1127 इसमांवर कारवाई.

अपराध सिद्धीचा दर वाढविण्यासाठी 2014 पासून आपण अनेक निर्णय घेतले. एकूण 12 शासन आदेश काढण्यात आले. मला आनंद आहे की त्यावेळी 8 टक्के असलेला दर आता 48 टक्के झाला आहे.

पोलिस भरती : – 18,831 पदांची भरती सुरु – 2022 मध्ये 78 पोलिस हवालदार पोलिस उपनिरीक्षक झाले. 850 पोलिस उपनिरीक्षक, 461 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 86 पोलिस निरीक्षक यांना पदोन्नती दिली.

महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना : 2022-2023 मध्ये पोलिस आणि कुटुंबीयांना 111 कोटींच्या उपचाराचे लाभ. पोलिस गृहनिर्माण : 187 पोलिस ठाणे, 305 सेवा निवासस्थाने, 46 इतर प्रशासकीय इमारती बांधकामांना मान्यता.

मुंबईत 7 एसटीपींचे काम सुरू झाले. यात धारावी, मालाड, वर्सोवा, घाटकोपर, भांडूप, वांद्रे, वरळी यांचा समावेश आहे. (2464 दशलक्ष लिटर क्षमता) मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नुकतेच त्याचे भूमिपूजन झाले. आता ते हे 3 ते 5 वर्षांत कार्यान्वित होणार.

मुंबईतील रस्त्यांचे क्राँकिटीकरण होते आहे. 265 कि.मींचे काम सुरू, आणखी 397 कि.मीसाठी 18 जानेवारीला कार्यादेश देण्यात आले. प्रसाधन गृह व इतरही सुशोभीकरण कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत.

मुंबईत 107 ठिकाणी आपला दवाखाना सुरू आहे. आणखी 200 हून अधिक आपला दवाखाना सुरू केले जाणार आहेत. यात 140 चाचण्या मोफत केल्या जातात.

मुंबईत अनेक पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. यात अनेक पुलांची कामे, कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड अशी अनेक कामे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे दुहेरी बोगदा प्रस्तावित आहे.

समुद्रातून गोड पाणी तयार करण्याचा प्रकल्प: एकूण 400 MLD पाणी तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 200 MLD चा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.

2014 ते 2019 या काळात मेट्रो प्रकल्पांनी मोठा वेग घेतला. आज एकूण 337 कि.मी. ची मेट्रोची कामे होत आहेत. – एकूण 14 लाईन्स – 225 हून अधिक स्थानके – 1.5 लाख कोटींहून अधिकची कामे – 2031 पर्यंत 1 कोटी लोक मेट्रोने प्रवास करतील, असे नियोजन – यातील मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 कार्यान्वित.

अशी आहे मेट्रो प्रकल्पांची प्रगती…

LIVE | DCM #DevendraFadnavis is replying to the discussions in Maharashtra Legislative Council on law & order, Mumbai issues & other infrastructure issues.

(माहितीसाठी भाषणाची लिंक: https://www.youtube.com/live/oOHvPTt3V74?feature=share )