Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली

By Devendra Fadnavis on August 24th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 24 ऑगस्ट

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या साक्षीदार आपण गमावल्या आहेत. त्यांच्या निधनाने ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीमा देव यांच्या निधनाची बातमी समजताच ते भावूक झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपल्या संदेशात म्हणतात, ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. गाजलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची संस्मरणीय भूमिका असो किंवा अनेक मराठी चित्रपट, एक मोठा कालखंड त्यांनी गाजवला. गेल्याचवर्षी रमेश देव आपल्यातून निघून गेले आणि आज सीमाताई! ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्या साक्षीदार होत्या. यशाची शिखरे चढूनही त्यांच्यात असलेला नम्र भाव उल्लेखनीय होता.

सीमाताई देव यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. रमेश देव आणि सीमाताई देव हे केवळ त्यांच्या जीवनातील नाही तर पडद्यावरचे सुद्धा समीकरण होते. एक मोठा कालखंड या दोघांनी गाजविला. सीमाताईंच्या आपल्यातून निघून जाणे ही सिनेमा जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. मी सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

https://x.com/dev_fadnavis/status/1694602240319971831?s=46&t=S0m9fgIBggcpst3bZGqn1g