मुंबई, 1 मे
CM Devendra Fadnavis :
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे….
- 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
- 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
- 5 जिल्हाधिकारी,
- 5 पोलिस अधीक्षक,
- 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
- 4 महापालिका आयुक्त,
- 3 पोलिस आयुक्त,
- 2 विभागीय आयुक्त आणि
- 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.
#महाराष्ट्रदिन #Maharashtra
https://x.com/dev_fadnavis/status/1917799450690437124?s=46&t=S0m9fgIBggcpst3bZGqn1g