नागपूरमधील जनतेने आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात पाठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इथले प्रलंबित असलेले विषय, तसेच जमीन मालकी हक्काबाबतचा महत्त्वाचा विषय मार्गी लावला. महाराष्ट्राच्या विकासात विदर्भातील जनतेला समान हक्क मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यातील तडफदार वकील नेहमीच अग्रेसर राहिला आहे. याबद्दल त्यांना २०१६ मध्ये प्रतिष्ठित नाग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर मागील ४७ वर्षांत मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या पदावरील कालावधी हा राज्याच्या राजकारणातील मैलाचा दगड ठरला आहे. लोककेंद्री सरकार हा भाव लक्षात ठेवून त्यांनी धोरणात्मक पद्धतीने सरकारचा कारभार चालवला. यामध्ये अत्याधुनिक तंत्राज्ञानाचा वापर, विकासाच्या दृष्टिने डायनामिक पद्धतीने घेतलेले निर्णय, लोकांच्या समस्यांचे निराकरण करणारे आणि परिणामकारक निर्णय घेऊन महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आणणारा हा काळ होता.
मुख्यमंत्री पदाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील विविध खात्यांचा कारभारही तितक्याच सक्षमपणे सांभाळला. यामध्ये गृह विभाग, सामान्य प्रशासन, आयटी, नगरविकास, न्याय व कायदा, बंदरे, माहिती आणि जनसंपर्क या खात्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
जलयुक्त शिवार अभियान हा फक्त सरकारसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प नव्हता, तर तो महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणाऱ्या प्रत्येकाचा होता. हे अभियान म्हणजे लोकांनी पाण्यासाठी चालवलेली चळवळ होती. या चळवळीने महाराष्ट्राला पाणी संवर्धनाची एक वेगळी दिशा दिली. सहा लाखाहून कमी किमतीत २२ हजारांहून अधिक गावांमध्ये या अभियानामुळे पाणी संवर्धनाची संरचना निर्माण झाली. एवढेच नाही तर गावागावांमध्ये सुसंवाद निर्माण झाला. गावावरील संकट दूर करण्यासाठी सर्वांमध्ये एकत्रितरीत्या काम करून त्यातून मार्ग काढण्याची भावना निर्माण झाली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा हक्क कायदा लागू करण्याची घोषणा करून आपल्या पारदर्शक आणि सुशासन कारभाराची चुणूक दाखवली. राज्यातील जनतेला मिळणाऱ्या सेवा अधिक कार्यक्षम पद्धतीने आणि ठराविक मुदतीत मिळाव्यात यासाठी हा कायदा महाराष्ट्राने आणला. या कायद्यांतर्गत जवळपास 393 सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्याचा लाखो लोकांना लाभ झाला. अशाचप्रकारे ‘आपले सरकार’ हे एक सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्रॅमसारख्या अनेक आऊट ऑफ द बॉक्स आयडिया राबवल्या आहेत. शिक्षण पूर्ण करून ऐन विसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या तरुणांना सरकारी धोरण आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला.
त्यांच्या कार्यकाळात राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली. मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो प्रकल्प, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (एमटीएचएल) सारखे महत्त्वाकांक्षी आणि शहराचा चेहरा बदलवणाऱ्या प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी, त्यातील अडथळे दूर करण्यासाठी वॉर रुमच्या माध्यमातून गती दिली.
पारदर्शक आणि शाश्वत कारभाराच्या माध्यमातून राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीला आणि औद्योगिकीकरणाला चालना दिली. यामुळे २०१६ मध्ये महाराष्ट्राने देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा विक्रम केला.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट क्षेत्र एक आश्वासक नेता म्हणन पाहत आहेत. यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्राकडून सामाजिक हितासाठी भक्कम पाठिंबा मिळवला आहे. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन, स्मार्ट (शाश्वत शेती व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन) आणि सहभाग (सोशल रिस्पॉन्सीब्लिटी सेल) या उपक्रमांचे उद्योजकांनी स्वागत करून त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
शाश्वत विकसाशी संबंधित घटकांमधील त्यांचे सखोल ज्ञान आणि त्याविषयी असलेला दृष्टिकोन पाहता त्यांना शाश्वत शेती, वातावरणीय बदल आणि ऊर्जा सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सस्थांनी आमंत्रित केले. यामध्ये आवर्जून उल्लेख करण्यासारखा म्हणजे, नीती आयोगाने ‘शेतीमधील परिवर्तन’ यावर आयोजित केलेल्या देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते.
देवेंद्र फडणवीस यांची कुशाग्रबुद्धी आणि राजकीय कसब याची वेळोवेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली. त्यांना अनेक प्रकारचे सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची जागतिक पार्लमेंटरिअन फोरमच्या आशिया विभागाच्या सचिवपदी निवड झाली होती. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये सामाजिक-आर्थिक विकासात सुधारणा केल्याबद्दल, जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. ही पदवी मिळवणारे ते भारतातील एकमेव व्यक्ती आहेत. सिंगापूरमधील प्रतिष्ठित ली कुआन यिव एक्सचेंज फेलो कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांचा विकासकामांसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल डेव्हलपमेंट पुरस्काराने गौरव करण्यात आला.
आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात व्यस्त असतानाही देवेंद्र फडणवीस हे आपली आई श्रीमती सरिता फडणवीस, बँकिंग आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेली सहचारिणी अमृता फडणवीस आणि दिविजाचे वडील म्हणून त्यांच्याप्रति असलेली आपली कर्तव्ये तितक्याच तन्मयतेने बजावत आहेत. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस यांना लेखन आणि वाचनाची आवड आहे. त्यांनी काही गाणी सुद्धा लिहिली आहेत. त्याचबरोबर त्यांना चित्रपट, वेब-सिरीज पाहणे, क्रिकेट खेळणे, संगीत ऐकायला आवडते.
श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या
Download PDF
