‘प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या मोठी असते, उत्तर देणाऱ्यांची संख्या छोटी असते, उत्तर देणारी एक संस्था ही २००० साली तयार झाली तिचं नाव आहे MKCL, त्यावेळच्या समाज जीवनापुढच्या प्रश्नाचं उत्तर हे केवळ MKCLने शोधलं नाही तर त्याच democratization करणं, प्रत्येक व्यक्तीला ते उत्तर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी करणं, ज्याला संगणक माहिती आहे तो साक्षर आहे ज्याला माहिती नाही तो साक्षर नाही आहे अशा प्रकारची अवस्था ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये MKCLनी खूप चांगल्या प्रकारे डिजिटल डिव्हाईड दूर करणं आणि त्याकरता एक वेगळं मॉडेल तयार करणं, दिलीप वळसे पाटलांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगले निर्णय घेऊन या स्थापनेमध्ये एक महत्वाची भूमिका निभावली’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस