अखिल विश्वामध्ये ज्यांनी भारताची मान उंच केली अशा नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, जीवेत् शरदः शतम् अशा प्रकारच्या आमच्या शुभेच्छा आहेत, एका दशकामध्ये परिवर्तन मोदीजींनी आणलं, जगातली आपण चौथी मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत, २ वर्षांनी आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत, २०४७ पर्यंत विकसित भारत तयार करून जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून वाटच सुरु करत आहोत, २५ कोटी लोकांना मोदीजींनी गरिबी रेषेतून बाहेर आणलं, मोदीजींच्या नेतृत्वात अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रोचे प्रकल्प तयार झाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस