सर्वांकरिता आनंदाचा सोहळा आहे, जागतिक स्तरावर बुद्धिबळाच्या माध्यमातून भारताची मान उंच केली, ती आपली महाराष्ट्राची नागपूरची लाडकी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हीच आज सत्कार होतोय, हा केवळ तिचा सन्मान म्हणून कार्यक्रम नाही तर देशातील, महाराष्ट्रातील हजारो मुलांना मुलींना, प्रेरणा देण्याकरता आहे, तुम्ही पण मनात ठरवलं तर करू शकता दिव्याने करून दाखवलं, सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस